नील सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई न्यायालयात
Neil Somaiya in Mumbai Sessions Court : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
मुंबई : Neil Somaiya in Mumbai Sessions Court : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. (BJP Leader Kirit Somaiya's Son Neil Somaiya in Mumbai Sessions Court for pre-arrest bail) कमी भावात जमीन विकत घेतल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊता यांनी केला होता. त्या आरोपांनंतर अटक टाळण्यासाठी नील सोमय्या यांच्या हालचाली वाढल्या आहेत. आज मुंबई सत्र न्यायालय सुनावणी होणार आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेना नेतृत्व आणि शिवसेनेला टार्गेट करत आहेत. तसेच मुंबई पालिकेच्या कारभारावरही त्यांनी टीका केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांची कोंडी करत करण्याचा प्रयत्न झाला आहे. नील सोमय्या यांचे नाव एका खंडणीच्या प्रकरणात आले होते. हे जुने प्रकरण असून याप्रकरणी नील यांची नव्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मुलुंड पोलीस ठाण्यात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. नील यांच्यावर बिल्डरकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे नील यांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस आता कोणती कारवाई करतात, याची उत्सुकता आहे. दरम्यान, अटक होण्याची शक्यता असल्याने नील यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.