मुंबई : राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. भाजप (BJP) नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी रेणू शर्मा (Renu Sharma) हिच्याविरोधात आरोप केले आहेत. तिच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिसांत गेलेत. दरम्यान रेणू शर्मा या महिलेविरोधात त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रेणू शर्मा या महिलेने मला भेटण्याचा प्रयत्न केला. मैत्री करण्यासाठी सोशल मीडियावरुनही मेसेज पाठविण्यात येत होता. ही मी तिच्याशी मैत्री केलेली नाही. दरम्यान, ही महिला आज धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुढे आले आहे. आणखी दुसऱ्याविरोधात पुढे येईल. मला जो अनुभव आला. त्यामुळे मी तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती कृष्णा हेगडे यांनी दिली. दरम्यान, रेणू शर्माविरोधात ब्लॅकमेलप्रकरणी आणखी दोघेजण तक्रार करण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळत आहे. 


2010 पासून रेणू शर्मा मला त्रास देत होती. वेगवेगळया फोन नंबरवरुन ती माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला प्रत्येकवेळी टाळत होतो. रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तिला माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायते होते. ती मला हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती, अशा थेट गंभीर आरोप कृष्णा हेगडे यांनी 'झी 24 तास'शी बोलताना केला आहे. ही महिला माझ्या मागे लागली होती. तेव्हा, मी माझ्या काही परिचयाच्या माणसांकडून तिची माहिती काढली. तेव्हा, ती फसवणूक करते, हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवत असल्याची मला माहिती मिळाली, असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले.


6 जानेवारीला 2021 ला तिचा अखेरचा मेसेज आला. तुम्ही मला विसरलात का, असे तिने म्हटले होते. काही दिवसातच धनंजय मुंडे यांचे प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे यांनी त्यांना ती महिला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले. रेणू शर्मा सारखे जे लोक ब्लॅकमेल करतात, त्यांचा भांडाफोड झाला पाहिजे, सत्य समोर आले पाहिजे म्हणून मी आज तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलो, असे कृष्णा हेगडे यांनी स्पष्ट केले.