मुंबई: माजी खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांना कोरोनाची Coronavirus लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. निलेश राणे यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असे निलेश राणे यांनी सांगितले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर खासदार नवनीत राणा यांच्यावरही सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहे. मध्यंतरी त्यांची प्रकृती काहीशी गंभीर झाली होती. त्यामुळे नवनीत राणा यांना उपचारासाठी अमरावतीहून मुंबईला हलवण्यात आले होते. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी महाविकासआघाडीमधल्या पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली होती.