मुंबई : राज्याच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या आणि कमी वयातच राजकारणाची खेळी अतिशय शिताफीनं खेळणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) या मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्येही कमीच दिसत आहेत. यावर खुदद् पंकजा मुंडे यांनीच एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे यांचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्या आहेत. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.


तुमची लेकरं परदेशात शाळेत...


यापैकी लक्ष्मण खेडकर या व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये लक्ष्मण खेडकर यांनी म्हटलं आहे. 'पंकजा मुंडे यांचा मुलगा परदेशात बोस्टनला शिक्षणासाठी पाठवलाय अशी बातमी सोशल मिडीयावर वाचली, आनंद वाटला, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीय, त्यासाठी एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खुप खुप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा'.


बोलघेवड्या पुढाऱ्यांकडून अपेक्षा नाहीत


'पंकजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजूरांच्या नेत्या या नात्याने, ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजूरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का ते ही जरा पाहा, लोकांची मुंडके मोडून स्वत:ची घर भरणाऱ्या बरबटलेल्या बाकीच्या बोलघेवड्या पुढाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षा नाहीयेत, राज्याची नसली तरी केंद्रातली सत्ता तुमच्या हातात आहे, तुमच्या लहान भगिनी प्रितमताई मुंडे ह्या खासदार आहेत तुम्ही स्वतः बहुमतात सत्तेत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहात, करा काही तरी, नाही तर असं नको व्हायला की तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात', असं या पोस्टमध्ये लक्ष्मण खेडकर यांनी म्हटलं आहे.


पंकजा मुंडे यांचं पोस्टवर उत्तर


लक्ष्ण खेडकर यांनी केलेल्या पोस्टवर पंकजा मुंडे यांनीही जोरदार उत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे म्हणतात 'जरूर लक्ष्मण मी ते करेन, आम्ही पहिल्यांदा  अमेरीका इथे आलो ते ही ऊस तोडणारी विमल (तेव्हा ते ऊसतोड कामगार होते) आणि तश्याच लढण्यास तयार राहून यश मिळवणार्‍या सख्या घेऊन. आता त्या योजनेचे चित्र बदलले असावे मी प्रमुख नाही राहिले.  


प्रत्येकाची लढाई भिन्न असते कोणाची जगण्याची आणि कोणाची जगवण्याची. मी अनेक ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलाच्या शिक्षण घेण्यासाठी मदत करत होते, करते आणि करत राहणार. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मधून गरजूंच्या शिक्षणाला मदत, आपत्ती ग्रस्त संसाराला मदत, रुग्णांच्या ईलाजासाठी मदत, covid 19 मध्ये covid centre, पूर ग्रस्त लोकांसाठी मदत फेरी, हे सर्व वंचित आणि शोषित यांच्या साठी करणे म्हणजे जगणे आहे. .आणि कष्ट आणि मेरिट यांची सांगड घातल्या शिवाय काहीही नाही होऊ शकतं, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


आर्यमनच्या आईच्या रोलमध्ये मी 100 टक्के


हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील "पंकजा कुठे आहे?"..  मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे!! आणि भूमिका ती मी नेहमी आवडीने बजावत असते. माझ्या आर्यमन च्या आई च्या रोल मध्ये मी 100 टक्के आहे, किमान पुढचे 8 ते 10 दिवस.. आर्यमन आता #Boston मध्ये उच्च शिक्षण घेणार आहे.. मी त्याच्या hostel वर त्याला सोडण्यासाठी आले आहे.. आर्यमन ची 10 वी झाली, 12 वी झाली मी हवा तेवढा वेळ देऊ शकले नाही,10 वी च्या परीक्षा चालू होत्या एकही पेपर च्या साठी मी उपस्थित नव्हते, तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या.. आता लेकरू 4 वर्ष नाही म्हणुन संपूर्ण वेळ त्याला देत आहे, अशी पोस्ट पंकजा मुंडे यांनी केली होती.