बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात उघडलेल्या आघाडीमुळे करुणा शर्मा सध्या चर्चेत असून बीडचं राजकीय वातावरणही तापलं आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या वाहनचालकास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, करूणा शर्मा प्रकरणानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेलं ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. 'परळी सुन्न आहे. राज्याची मान खाली गेली आहे,' असं ट्वीट पंकजा यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.


पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे


“अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची !!”, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावर भाष्य केलंय. 



भाजप मैदानात उतरणार


दुसरीकडे करुणा शर्मा यांच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरणार आहे, भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी ही घोषणा केली आहे. करुणा शर्मा यांच्यावर अन्याय झालाय. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे. त्यांच्या गाडीत पिस्तूल टाकण्यात आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी भाजपकडून करण्यात आलीय.