मुंबई :  Coronavirus : कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Pravin Darekar Corona Positive)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत सातत्याने वाढती रूग्णसंख्या हा चिंतेचा विषय झालाय. राज्यात निदान झालेल्या 18 हजार 466 रूग्णांपैकी 10 हजार 860 रूग्ण एकट्या मुंबईतले आहेत. दाट लोकवस्ती, प्रवास करणा-या मुंबईकरांची मोठी संख्या, अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत होणाऱ्या अधिक चाचण्या, नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन यामुळे रूग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून आले आहे. 


विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रतीक्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव झला आहे. प्रवीण दरेकर यांनी खबरदारी म्हणून घरात विलीगिकरण केले आहे. कालपासून दरेकर यांना ताप आणि थंडी आल्याने आरटीपीसीआर टेस्ट केली होती. दरेकर हे सेंट जॉर्ज रुग्णालयात खबरदारी म्हणून दाखल झाले आहेत. तर गायक सोनू निगम, अभिनेता अंकुश चौधरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राजकीय नेत्यापैकी काँग्रेस आमदार धीरज देशमुख, आमदार रोहित पवार, पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अतुळ भातखळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.


तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. तर खासदार अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.