पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडी (ED) कार्यालयात चौकशी सुरु आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबतीतही सुरुवातीला आरोप फेटाळले नंतर त्यांचा आवाज क्षीण झाला,  आणि आता अनिल देशमुख कोण असा प्रश्न ते आपापसात विचारत आहेत. तसंच आता होऊ देऊ नका, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.


छगन भुजबळ बिचारे दोन वर्ष आतमध्ये होते, आता अनिल देशमुख आतमध्ये आहेत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय, यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कर नाही त्याला डर कशाला, ईडीची चौकशी आली तर घाबरता कशाला, त्यांनी चौकशीला सामोरं जावं, त्यांचा दोष नसेल तर न्यायालय  त्यांच्या बाजने निर्णय देईल, तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पाहिजेत, तुम्ही न्यायालयात एकही केस जिंकू शकलेले नाहीत.  असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 


आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांच्या सोबत असले तरी माकडाच्या गोष्टीसारखी त्यांची संस्कृती आहे. पुर आल्यानंतर माकडीन पिल्लाला छातीशी कवटाळून बसते मग छातीशी घेते, मग डोक्यावर घेते, पण तिच्या नाका-तोंडात पाणी गेल्यावर ती पिल्लाला पायाशी घेते, अशी यांची संस्कृती आहे.


शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) नेहमीच जातीय राजकारण करतात, मराठी विरुद्ध नॉन मराठा, मुस्लिम विरुद्ध नॉन मुस्लिम असं कार्ड ते खेळत असतात अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.