मुंबई : महाराष्ट्रात भाजपाचं एक स्वप्न होतं, अखेर ते भंगलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ही इच्छा व्यक्त केली होती, पण राजकारणात लोकमतापुढे कुणाचंही चालत नाही. भाजपाचं हे स्वप्न पूर्ण होईल असं वाटत असताना, हे स्वप्न पूर्ण होवू शकलं नाही. अनेक जण भाजपाचं हे स्वप्न पूर्ण होईल का याकडे डोळे लावून बसले होते, पण यात अखेर भाजपला अपयश आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खुद्द एका सभेत बोलून दाखवलं होतं की, दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत पक्षाची बैठक होती, या बैठकीला मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. यावेळी रात्रीचे २ वाजले असावेत, बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी चंद्रकांतदादा आणि मुख्यमंत्र्यांना बोलावून घेतलं.


नरेंद्र मोदी यांनी चंद्रकांतदादा यांना आवाज देत, दादा इधर आओ, असं म्हणत बिटीया गिरनी चाहिए, असं सांगितलं. बिटीया म्हणजे सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला पाहिजे, असं नरेंद्र मोदी यांना म्हणायचं होतं, असं चंद्रकांतदादा यांनी हा किस्सा सांगताना स्पष्ट केलं.



पण अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या १ लाखापेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे. मात्र दुसरीकडे अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात दारूण पराभव झाला आहे.