भाजपच्या या आमदाराने मागितली लाच, ऑडियो क्लिप व्हायरल
आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.
आमदार राजू तोडसाम यांच्यावर २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी याप्रकरणी तोडसाम यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केलीये.
व़डगाव पोलीस ठाण्यात तोडसाम यांच्याविरोधात तक्रार दाखल कऱण्यात आलीये. दरम्यान, तोडसाम आणि कंत्राटदार यांच्यातील संभाषणाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीये.