वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आमदार राम कदमांनी मागितली माफी
आमदार राम कदम यांचा माफीनामा
मुंबई : आमदार राम कदम यांनी मुली पाळवण्याबाबत केलल्या विधानबाबत त्यांनी आज माफी मागितली आहे. सर्वत्र टीका होत असतांना अखेर राम कदम यांनी आज ट्विटरवरुन झालेल्या प्रकरणाची जाहीर माफी मागितली आहे.
'माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे. असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.
त्याआधी आमदार राम कदम यांनी मुली पाळवण्याबाबत केलल्या विधानबाबत घाटकोपर पोलीस पोलीस ठाण्यात तर सर्वच पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कदमांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ठिय्या आंदोलन सुरुच होतं. पोलिसांनी सरकारी वकिलांशी चर्चा करून गुन्हा दाखल होईल का याची चाचपणी करण्याचं आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं.
सकाळी ११ पर्यंत वाजता जर गुन्हा दाखल झाला नाही तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.