मुंबई : घाटकोपर पश्चिमचे भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात महिलांबाबत बेताल वक्तव्य केले. त्यानंतर संपूर्ण राज्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत आंदोलनही करण्यात येत आहे. महिलांनी आपला संताप व्यक्त केलाय. तर भाजपने त्यांचे प्रवक्ते पद स्थगित केलेय. आता दहीहंडी समन्वय समितीने राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवावर बहिष्कार घातलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहीहंडी समन्वय समितीचा भाजप आमदार राम कदम यांच्या दहिहंडी उत्सवावर बहिष्कार, घातल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी समन्वय समितीचे सदस्य असलेले एकही गोविंदा पथक राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात जाणार नाही, अशी समन्वय समितीने जाहीर भूमिका घेतली आहे.


समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. राम कदम यांनी या कार्यक्रमात एका अभिनेत्रीसाठी लावलेला सात थर खाली घेण्यात भाग पाडले. त्यामुळे गोविंदा पथकांमधून नाराजी व्यक्त होत होती. गोविंद पथकाचा त्यांनी अवमान केल्याची भावना उपस्थितांमध्ये होती. तसचे  राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान केले होते. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदम यांनी म्हटले होते.