मुंबई : गुरुवारी रात्री दीड वाजल्याच्या सुमारास आमदार सरदार तारासिंहांच्या गाडीला भीषण अपघात झाला. मुलुंडमध्ये ही घटना घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवर मुलुंडच्या दिशेनं येताना भरधाव वेगानं गाडी पोलीस चौकीवर आदळली. यात चौकीत बसलेले पोलीस कॉन्स्टेबल आणि गाडीचा चालक दोघेही जखमी झालेत. दोघांनाही जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.


अपघात इतका भीषण होता की वाहतूक पोलीस चौकीची भिंत तुटून आतील सर्व सामानाची देखील मोडतोड झाली आहे.


दरम्यान, हा अपघात कसा घडला? ड्रायवरनं मद्यपान केले होते का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.