मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनाला थेट इशारा दिला. शिवसेना (Shivsena) वाढली त्यात आमचा मोठा सहभाग आहे. आता जे अपशब्द वापरतायेत त्यावेळी ते कुठेही नव्हते. आमचा बंदोबस्त करायचा असेल तर करू द्या. पोलिसांनी सगळं पाहावं, आम्ही तिघेही मुंबईत नव्हतो. तिथं आमच्या घरावर आंदोलन करताहेत. तुम्हाला घरं आणि मुलंबाळं नाहीत. तुम्ही कोणी माझं काही करू शकत नाही, तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही  मी सगळ्यांना पुरून उरलोय, असं नारायण राणे यांनी पत्रकार परिषेद म्हटलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागलेले आहेत. याचा अर्थ देश कायद्याने चालतो आहे हे सिद्ध झाले आहे, असे सांगत त्यांनी 17 सप्टेंबरपर्यंत आपल्यावर झालेल्या कारवाई प्रकरणावर अधिक भाष्य करणार नसल्याचेही ते म्हणाले.


मी गँगस्टर असूनही शिवसेनेनं मला मुख्यमंत्री का केलं? याचं उत्तर त्यांच्याकडं आहे का? असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी पश्चिम बंगालसारखं वातावरण आम्ही महाराष्ट्रात निर्माण होऊ देणार नाही असं म्हटलं.


देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही


“मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो.” असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं. 


जनआशिर्वाद यात्रा सुरुच राहणार


काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आलं आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. जन आशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. गेल्या सात वर्षात त्यांनी केलेली काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरु आहे. आता दोन दिवस विश्रांती घेत परवापासून सिंधुदुर्गातून यात्रेला सुरुवात होईल. त्यामध्ये व्यत्यय पडणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. 


या काळात भाजपा माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला त्यासाठी नड्डा साहेब, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस बाकी खासदार आमदार सर्वांचं मला पाठबळ मिळालं मी त्यांचा आभारी आहे.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.


हे शब्द असंसदीय नाहीत का?


हा योगी आहे की ढोंगी, चप्पलाने मारले पाहिजे, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चप्पलाने मारलं हे शब्द वापरलेले चालतात? केंद्रीय मंत्री अमित शाह यांना निर्लज्ज असा शब्द वापरला ते चालतं का? हे शब्द असंसदीय नाहीत का? असा सवाल त्यांनी विचारला.


तो आम्ही गप्प बसणार नाही


दिशा सालियानचे कुणी केले, काय केल? पूजा चव्हाणचे काय झाले. त्या मंत्र्याला अटक करेपर्यंत आम्ही पाठलाग करणार. ते आत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.