मुंबई : शिवसेनेचा सध्याचा रागरंग पाहता विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने एकट्याने सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 2014 प्रमाणेच लवकरच सरकार स्थापना केली जाईल अशी शक्यता आहे. भाजप फ्लोअर टेस्टला जाण्याची तयारीही सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे. शपथविधीसाठी 31 तारखेचा मुहुर्त ठरल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 30 ऑक्टोबरला मुंबईत येणार आहेत. या दौऱ्यात ते मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. भाजपाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी ही माहिती दिली आहे.


भाजपनं 164 जागा लढवत 106 जागा जिंकल्या. पक्षाचे एकूण 70 टक्के आमदार निवडून आले. गेल्या 40 वर्षातील हे विक्रमी यश असून या निवडणुकीत भाजपाला अपयश आल्याचं मान्य करता येणार नाही असं भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलंय...त्याचप्रमाणे ज्या पक्षाच्या सरकारनं बाळासाहेबांना पिंजऱ्याच्या गाडीत घालून नेलं होतं त्या पक्षासोबत शिवसेना कदापि जाणार नाही, आणि शिवसैनिकही ते स्वीकारणार नाही असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला आहे.