इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांचा विधान परिषद कामकाजावर बहिष्कार
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. सत्ताधारीच विधान परिषदेमध्ये नसल्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
विधान परिषदेमध्ये विरोधकांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे ते गोंधळ घालतात. मंत्र्यांना आणि सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना बोलून दिलं जात नाही असा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला. याबाबतचं निवेदन सरकारनं सभापती आणि उपसभापतींनाही दिलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सगळे नियम पायदळी तुडवत, गोंधळ घालून सभागृह चालू न द्यायचं काम करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला आहे.