मुंबई : कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये मिशन कमळ राबवण्यासाठी भाजपने पावले उचलायला सुरुवात केली आहे. गेले काही दिवस भाजपने दिल्ली विधानसभा निडवणुकीसाठी देशभरातून पक्षाची संपूर्ण ताकद पणाला लावली होती. आता यापुढे भाजपने हातातोंडाशी येऊनही सत्ता गमावलेल्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश वर लक्ष केंद्रित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे मिशन कमळ सुरू होऊ द्या इकडे धनुष्यबाण आहे, त्याला कधी वेळेवर सोडण्यासाठी घड्याळही आहे आणि मजबूत हातही असल्याचा टोला भुजबळांनी हाणला आहे.


राज्यात मध्यावधी निवडणुकीसाठी कोणताही पक्ष आणि आमदार तयार नाहीत. पण जर भाजपला सत्ता मिळवण्याची असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घ्यावं लागणार आहे. पण यावरुन ही भाजप नेत्यांमध्ये मतप्रवाह आहेत. काही जण राष्ट्रवादीसोबत जायला तयार आहेत तर काही जणांचा याला विरोध आहे. शिवसेनेसोबत जाण्यात ही काही जणांचा विरोध आहे. त्यामुळे भाजप हे मिशन कमळ कसं राबवणार हे पाहावं लागेल.


भाजपने याआधी राष्ट्रवादीचा हात धरला होता. पण हे सरकार जास्त टिकू शकलं नाही. पण ही शक्यता पुन्हा नाकारता येणार नाही. शिवसेनेसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 25 वर्ष युतीत असणाऱ्या भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेसोबतची युती तोडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मदतीने आवाजी मतदानाने भाजपने सरकार स्थापन केलं. पण नंतर पुन्हा शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली होती. पण आता चित्र उलट आहे. सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपला विरोधात बसावं लागलं.