मुंबई : एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde Group) सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दणका देण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. मुंबई दौऱ्यावर आलेल्या गृहमंत्री अमित शहा (Amit Shah in Mumbai) यांनी तसे संकेत दिले. सोमवारी पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना धडा शिकवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला असून त्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. अमित शहा यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, राजकारणात आपण सर्व काही सहन करू शकतो, परंतु फसवणूक सहन केली जाऊ शकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शहा यांनी बीएमसी निवडणुकीच्या (BMC Election) तयारीचाही आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, बीएमसी निवडणुकीत मिशन 150 चे टार्गेट कसे गाठता येईल, यावर काम करायला हवे. बीएमसी ही देशातील सर्वात मोठी नागरी संस्था आहे आणि भाजप दीर्घ काळापासून ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला घेरण्याची तयारी चालवली आहे. एवढेच नाही तर काही भागात भाजपलाही राज ठाकरे यांच्यासोबत उतरायचे आहे. यातून शिवसेनेची मते तोडण्याचा त्यांचा डाव असल्याचे मानले जात आहे.


नुकतीच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हापासून बीएमसी निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) भाजप आणि एकनाथ शिंदे गटासोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा रविवारी संध्याकाळीच मुंबईत पोहोचले होते आणि आज सकाळी त्यांनी अनेक ठिकाणी गणेशपूजेला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते त्यांच्यासोबत होते.


एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात पोहोचले. भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील एकी सध्या कोणत्या पातळीवर आहे. यावरूनही शहरात अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर, पोस्टर लावले होते, हे यावरून समजू शकते. 


विशेषत: मातोश्रीजवळील परिसरात, वांद्रे पूर्व भागात मोठ्या प्रमाणात बॅनर लागले आहेत, त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे अंतर्गत सूत्र सांगतात, “शहांचं स्वागत करणारे बॅनर हे शिंदे गटाच्या रणनीतीचा भाग आहेत. अमित शहांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एकनाथ शिंदे यांची ही पद्धत आहे. याशिवाय उद्धव ठाकरे गटाला आरसा दाखवण्याचाही प्रयत्न आहे.