मुंबई : भाजपेचे नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आला आहे. या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाले आहे. तसेच या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या दरवाजाची काचही तुटली. सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाल्याने रक्त निघालं आहे. या हल्ल्याविरुद्ध भाजप रविवारी संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी दिली. (bjp will stage agitation in maharashtra on april 24 against attack on kirit somaiya van says chandrakant patil)


चंद्रकांत पाटील काय म्हणाले? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"कार्यकर्त्यांनी या हल्ल्याविरुद्ध रविवारी संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी जसं सुचेल तसं निषेध नोंदवला पाहिजे. तसेच आरोपीला पकडेस्तोर आंदोलन सुरु राहिल", असं पाटील म्हणाले. 



नक्की काय घडलं?


नवनीत राणा आणि रवी राणा यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याने खार पोलिसांनी त्यांना अटक करत गुन्हा दाखल केला. या राणा दाम्पत्यांना भेटण्यासाठी सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेले होते.


आधीच दिवसभर राणा विरुद्ध सेना असं सामना रंगला होता. शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यात सोमय्या खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्यांना भेटायला गेले होते. तेव्हा शिवसैनिक आणखी आक्रमक झाले. खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. 


राणा दाम्पत्याची भेट घेतल्यानंतर सोमय्या बाहेर पडले. या दरम्यान बाहेर आक्रमक आणि संतापलेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान काही जणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यावेळेस गाडीवर, दगड, बाटल्या आणि चपल्या फेकण्यात आल्या. या हल्ल्यात सोमय्या यांच्या हनुवटीला इजा झाली. 


या हल्ल्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलंय. भाजपने या घटनेचं निषेध केलं आहे. तसेच या घटनेविरुद्ध रविवारी संपूर्ण राज्यात सुचेल तसं आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात वाद होण्याची चिन्हं आहेत.