मुंबई : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात (Legislative monsoon session) ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव ठाकरे सरकारने विधानसभेत मांडला. त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर भाजपच्या 12 गोंधळी आमदारांचे निलंबन केले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या  (Maharashtra Vidhan Bhavan) बाहेर पडसाद दिसून आलेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 भाजपने आज प्रतिविधानसभा आंदोलन सुरू केले आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपने प्रतिसभागृह भरवले आहे. भाजपने पायऱ्यांवर आंदोलन केले. आज भाजपने विधीमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकलाय. विधानसभेच्या कामकाजात भाजप आमदार सहभागी झाले नाहीत. प्रतिसभागृहाचे अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांना करण्यात आले आहे.



महाविकास आघाडी सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला आहे. भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत सरकारच्या विरोधात हा धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांनी हा प्रस्ताव मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.


ओबीसी  राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी सोमवारी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावाच्या वेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.