मुंबई : मंत्र्यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सरकारी तिजोरीतून बिलं भरल्याच्या मुद्द्यावर भाजपनं टीका केली आहे. तर हा खर्च नियमांनुसारच झाला, असा सरकारचा दावा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्र्यांच्या खासगी हॉस्पिटलमधील उपचाराच्या भरमसाठ बिलावरुन विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना झाल्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले होते. मविआच्या मंत्र्यांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवाल करीत मंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.



मंत्र्यांनी हॉस्पिटलची बिलं सरकारच्या तिजोरीतून भरल्याच्या झी २४ तासच्या EXCLUSIVE बातमीची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दखल घेतली. सरकारी तिजोरीतून भरलेली ती बिलं आईच्या उपचारांची होती. वैयक्तिक उपचारांसाठी एकही रुपया घेतला नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.