मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ( Maharashtra Mahavikas Aghadi Government) सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. लोकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. राज्य सरकार कोरोना (Coronavirus) आटोक्यात आणला आहे, अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात याचे आश्चर्य वाटते. मात्र यानिमित्ताने जे पाठ थोपटून घेतात त्यांना सांगणे आहे की, सर्वाधिक कोरोना केसेस महाराष्ट्र ( Maharashtra) आणि मुंबईत (Mumbai) का, सर्वात जास्त मृत्यू इथे का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मुंबई पालिकेवर (Mumbai Municipal Corporation) भाजपचा (BJP) झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


 भ्रष्टाचारची लक्तरे टांगणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई भाजप कार्यकारणी बैठकीचा समारोप आज झाला. त्यावेळी ते  बैठकीत मार्गदर्शन करीत होते. मला विश्वास आहे की, ही भाजपची मुंबईतील नवी कार्यकारणी ही मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, फडणवीस म्हणालेत. कोरोना मृत्यू लपवले गेले आहेत, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रची भीषण अवस्था का? काही लोकांनी आपलेच चांगभल करून घेतले. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे. आम्ही आधी टीका करत नव्हतो, मात्र आता भ्रष्टाचारची लक्तरे टांगल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा महाविकासआघाडी सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


वीज बिल माफीच्या घोषणेवर घुमजाव


कोरोनाच्या नावाने कोणाला कंत्राट द्यायचे याची चिंता होती. हे सर्व उघड केल्याशिवाय रहाणार नाही. वीज बिल माफीच्या घोषणेवर घुमजाव केले, गरीबाशी केलेला विश्वासघात आहे हा, गरिबांची थट्टा केली आहे. बदल्या करा माल कमवा, कशा प्रकारे बदल्यांचा बाजार यांनी मांडला आहे. बावनकुळे यांनी ऊर्जा विभागात गेल्या पाच वर्षात चांगले काम केले. सध्याचे सरकार सावकार झाले आहेत, एक पैशाची नवी मदत कोणाला केली नाही. हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. बिहारच्या निवडणुकीत खारीचा वाटा माझा आहे, मात्र मोदींमुळे यश मिळाले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


राजाचा जीव जसा पोपटात


राक्षस आणि राजाचा जीव जसा पोपटात असतो तसा काहींचा जीव मुंबई महापालिकेत असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. कोरोनाच्या संकटात बीएमसीतील सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार जाणिवपूर्वक मेट्रो रखडवत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार झालाय. यावर कोविड भ्रष्टाचार पुस्तिका छापणार असे जाहीर केले आहे. इच्चा तिथे मार्ग, टाइमपास करायचाय म्हणून कांजुरमार्गला मेट्रो कारशेडचा घाट घातला जात आहे. मेट्रोपासून मुंबईकरांना वंचित ठेवण्यासाठी हा घाट आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.