मुंबई : मुंबईच्या किनाऱ्यावर आलेल्या गेल्या आठवड्याभरात ब्लू बॉटल जेलिफीशचा उपद्रव वाढत चालला आहे. चौपाट्यांवर फिरायला आलेल्या पर्यटकांना याचा सर्वाधिक फटका बसतो आहे. उपनगरातल्या अक्सा चौपाटीवर ब्लू बॉटल जेलिफीशमुळे ५० जणांना दंश केला आहे. तर गिरगाव चौपाटीवर आतापर्यंत पाच जणांना जेलिफीशच्या दंशांला सामोरं जावं लागलं आहे. महापालिकेनं सगळ्याच चौपट्यांवर पर्यटकांना जेलिफीश आल्यानं काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पण आवाहन करणारे फलक पर्यटकांच्या नजरेस पडणं कठीण आहे. समुद्र किनारी आनंद लुटायला आलेल्या पर्यटकांना विशेषतः लहान मुलांना जेलिफीशच्या दंशानंतर तीव्र वेदनांना समोरं जावं लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



बहिरे झाल्याची तक्रार


तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात समुद्राच्या किनाऱ्यावर जेलिफिश येतात. हा त्यांच्या पुन्हा निर्मितीचा वेळ असतो. यांच्या संपर्कात आल्याने ते दंश करतात. ज्यामुळे शरीराचा तेवढा भाग सुन्न होतं. काही प्रकरणांमध्ये यांच्या दंशामुळे बहिरे झाल्याची देखील तक्रार समोर आली आहे.


मुंबईमध्ये मागील 20 दिवसांमध्ये अनेकांना जेलीफिशने दंश केलं आहे. जेलीफिशने दंश केल्यामुळे त्याचा खूप त्रास होतो. खूप वेळ दुखणं असेल तर डॉक्टरांचा उपचार घेणं गरजेचं असतं.