लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर लागणार निळ्या रंगाचे दिवे
रेल्वे प्रशासनाची नवी युक्ती
मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर आता निळ्या रंगाचे दिवे बसविण्यात येणार आहे. लोकल सुरू झाल्यानंतर हे दिवे पेटणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ट्रेन सुरू झाल्याची माहिती मिळणार आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार असून, यामुळे रेल्वे अपघातांच्या संख्येत घट होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून दिलीये. रेल्वे अपघाताच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. धावती लोकल पकडण्याच्या नादात बरेचदा रेल्वे आणि फलाटाच्यामध्ये प्रवाश्यांचा पाय अडकुन अपघात होतात. त्यामुळे हा निर्णय महत्वपुर्ण ठरणार आहे.
लोकलमध्ये चढताना आणि उतरताना होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने हे पाऊल उचललं आहे. लोकलच्या प्रत्येक दरवाजावर एक निळ्या रंगाचा दिवा बसवण्यात येणार आहे. ट्रेन सुरू होताच हा दिवा पेटेल. त्यामुळे प्रवाशांना तो संकेत पोहोचेल की लोकल आता सुरु होणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हा दिवा कसा काम करेल ते दाखवण्यात आलं आहे. लोकलमध्ये चढताना आणि उतरताना वाढत्या घटनांचं प्रमाण पाहता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वे अपघाताच्या घटना कमी होतील अशी आशा आहे.