मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशोक खैरनार हे वांद्रे पूर्व येथील एच पूर्व विभागाचे ते वॉर्ड ऑफिसर होते. ५७ वर्षांचे अशोक खैरनार यांना आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर सुरूवातील गुरूनानक हॉस्पिटल, नंतर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल त्यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवले गेले होते, पण आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला.
शिवाजी पार्क स्मशानभूमीत अशोक खैरनार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुरूवातीला रूग्णसंख्या वाढलेल्या वांद्रे पूर्व येथील एच पूर्व विभागात अशोक खैरनार यांनी प्रयत्न केले. खैरनार यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईत सर्वात कमी ग्रोथ रेट त्यांच्या एच इस्ट वॉर्डचा होता. रुग्णसंख्या वाढीचा दर रोखण्यात तसंच, डबलींग रेट वाढवण्यात त्यांना यश आलं होतं. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीचा परिसर एच पूर्व विभागात येतो.
यापूर्वी पालिकेचे उपायुक्त शिरिष दीक्षित यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसंच आतापर्यंत पालिकेतील १०० हून अधिक कर्मचा-यांचा कोरोनानं बळी घेतला आहे.