BMC Bharti: बारावी, पदवीधर आहात? मग मुंबई पालिकेअंतर्गत तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एक्स रे असिस्टंट,टेलिफोन ऑपरेटर, नोंदणी सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा याचा तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पालिकेअंतर्गत एक्स रे असिस्टंटच्या 5 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठामार्फत चालविला जाणारा एक्स रे विषयातील बी.पी.एम.टी हा 3 वर्षाचा पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. किंवा उमेदवाराने बारावी सायन्स/एमसीव्हीसी आणि रेडीओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


EPFO अंतर्गत भरती, चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी 'असा' करा अर्ज 


अर्जाची शेवटची तारीख


तसेच टेलिफोन ऑपरेटर, नोंदणी सहाय्यक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी 25 मार्चपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.एक्स रे असिस्टंट पदासाठी 28 मार्च 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. टेलिफोन ऑपरेटर आणि नोंदणी सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 14 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. 


कुठे पाठवाल अर्ज?


दोन्ही पदांसाठी उमेदवारांनी आपला अर्ज वैद्यकीय अधिक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई-400015 या पत्त्यावर पाठवायचा आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.


म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती


म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत  DBW पदांची भरती केली जाणार आहे. या पदाच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. असे असले तरी ही नोकरी विशिष्ट कालावधीसाठी असणार असेल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. अटेंडंट ऑपरेटक केमिकल प्लांटमध्येही भरती केली जाईल. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड आणि  म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत ट्रेनिंग घेतलेल्या आणि कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना येथे नोकरी करता येणार आहे. 1 वर्षाच्या कालावधीसाठी ही नोकरी असून याचा कालावधी 4 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.  30 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


BMC Job: मुंबई पालिकेत विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज