मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे याकडे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील वर्षीच्या बजेटपेक्षा हे बजेट दीड ते दोन हजार कोटी रुपयांनी अधिक असण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून हिरवा कंदिल न मिळाल्याने बेस्टचं बजेट बीएमसी बजेटमध्ये विलीन करण्याची संधी यावेळी हुकली आहे. 


मात्र यावेळी सुद्धा मुंबईकरांवर काही प्रमाणात करवाढीची टांगती तलवारही असणार आहे. त्यामुळे यातून काय सादर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.