BMC Budget 2023 :  मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये ( Mumbai Budget 2023 ) कोणताही मोठा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. ( BMC Budget )तसेच जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.  (Mumbai Municipal Corporation Budget 2023) त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मुंबईकरांसाठी चांगली बातमी मिळाली आहे. (BMC Budget 2023 Updates) आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ सूचविण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना महागाईत मोठा दिलासा मिळाला आहे.( BMC Budget In Marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BMC Budget 2023 Updates : मुंबई पालिकेचे 52619 कोटींचे बजेट, 'यासाठी' विशेष तरतूद


मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. ते म्हणाले,  52619.07 कोटी रुपयांचे हे बजेट आहे. प्रथमच 50 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 14.50 टक्के अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षाशी तुलना केली आता  52 ट्क्के कॅपिटल म्हणजे विकासवर खर्च होणार 48 टक्के इतर गोष्टींवर खर्च होणार आहे.  विकास कामांवर प्रथमच 50 टक्के अधिक खर्च केला जाईल.


मुंबई महापालिकेत तब्बल 36 वर्षांनी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक केल्यानंतर  प्रथम प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी विकास कामांना प्राधान्य दिले आहे. नवीन प्रकल्प हाती न घेता जुन्या प्रकल्पांना भरीव तरतूद केल्याने या अर्थसंकल्पाला विशेष महत्व आहे.


BMC Budget Updates पाहा :


BMC Budget 2023 Updates :  मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नविन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.


BMC Budget 2023 Updates : पाणी पुरवठा प्रकल्प विभागासाठी 1376 कोटी. गेल्यावर्षी 887.88 कोटी 
- आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रिया केंद्र. यात कुलाबा येथे मलनिस्सारण केंद्रातील मलजलाचे पाणी पिण्यायोग्य पाण्यामध्ये रुपांतरित करणार प्रतिदिन 12 दशलक्ष लिटर पाणी  यासाठी 32 कोटी 
- जलवाहन बोगद्याच्या कामासाठी 119.50 कोटी
- जलवाहिन्यांचे पुनर्वसन आणिपुनरस्थापना 136 कोटी


शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्पासाठी विशेष तरतूद


BMC Budget 2023 Updates :  मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्प आणि धोरणाचा अर्थसंकल्पामध्ये (BMC Budget 2023) विशेष तरतूद
- शिक्षण विभाग अंतर्गत नवीन योजना व प्रकल्प
- बीएमसी शाळेतील मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार
- बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जाणार
- मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअरची निर्मिती
- दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता साहित्य खरेदी केली जाणार
- बीएमसी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, बोलक्या संरक्षण भिंतीची निर्मिती, नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्र उभारणी केली जाणार


BMC Budget 2023 Updates :  मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात  सात एसटीपी प्रकल्पांसाठी 2792 कोटी रूपयांची तरतूद


BMC Budget 2023 Updates :  मुंबई महापालिका सामाजिक प्रभाव उपक्रम.महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासाठी भरीव तरतूद 
- महिला बचतगट - 11.65 कोटी 
- महिला अर्थ सहाय्य योजना - 100 कोटी 
- दिव्यांग व्यक्तीसाठी अर्थ सहाय्य 25.32 कोटी 
- तृतीय पंथीयांसाठी पहिल्यांदाच अर्थ सहाय्य 2 कोटी
- ज्येष्ठ नागरिक - 11 कोटी 
- महिलांसाठी प्रशिक्षण योजना 6.44 कोटी


BMC Budget 2023 Updates :  राज्य सरकारकडून मालमत्ता करासह विविध येणे थकबाकी 7223 कोटी इतकी आहे. थकबाकी देण्याची पालिकेची राज्य सरकारला विनंती


BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 2570 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


BMC Budget 2023 Updates : मुंबई अग्निशमन दलासाठी 227 कोटींची तरतूद


BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात  मुंबईचा वाढत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदा दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे   


BMC Budget 2023 Updates : मुंबईचा वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वायू प्रदूषण नियंत्रण कृती योजना अस्तित्वात आणली आहे. दरवर्षी हिवाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक खराब होतो त्यामुळे हवेच्या गुणवत्ते वर परिणाम होतो


BMC Budget 2023 Updates : आरोग्य विभागासाठी 1680 कोटी रूपयांची तरतूद. मागील वर्षी  1287 कोटींची तरतूद होती. 


BMC Budget 2023 Updates :  भायकळा येथील राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद  ।  गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण होणार 


मुंबईत चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार


BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार, खासगी कंपन्यांद्वारे उभारणी होणार आणि पालिकेची उत्पन्नात भागिदारी तत्वावर महसूल उभारणीचा प्रयत्न 


गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण


BMC Budget 2023 Updates : मुंबई मलनिसारण प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 2792 कोटी रुपये तरतूद तर गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण होणार 


BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात  गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1060 कोटी रूपयांची तरतूद


BMC Budget 2023 Updates :  मुंबईकरांना पार्किंग अ‍ॅपच्या मदतीने 32 सार्वजनिक पार्किंग लॅाट आणि 91 ॲानस्ट्रीट वाहनतळ सेवा मिळणार आहे


 रस्ते आणि पुलांसाठी भरीव तरतूद


BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात रस्ते आणि पुलांसाठी 4925 कोटी रुपयांची तरतूद


बेस्टला 800 कोटी  तर कोस्टल रोडसाठी 3545 कोटी


BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात  बेस्टला 800 कोटी रुपयांची मदत दिली जाणार तर कोस्टल रोडसाठी 3545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्प तब्बल 52619 कोटी रुपयांचा सादर करण्यात आलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6670 कोटी रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 45949 कोटींचे होते बजेट


मुंबई महापालिकेचे बजेट 52619 कोटी रुपयांचे


BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं आकारमान 50 हजार कोटींच्यावर गेले आहे. (BMC Budget 2023)  यावर्षी  शिक्षण विभागाचे बजेट 3347 कोटी रूपयांचे सादर तर मुंबई महापालिकेचे बजेट 52619 कोटी रुपयांचे. बजेटने केली पहिल्यांदाच पन्नाशी पार