BMC Clerk Bharti: लोकसभा, विधानसभा निवडणुका संपल्यायत. लवकरच राज्यात सरकार स्थापन होईल. पालिकांच्या निवडणुकादेखील येत्या 2-3 महिन्यात लागण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेकडून लिपक भरतीचा तपशील देण्यात आला आहे. या भरतीअंतर्गत तुम्हाला चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळू शकते. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले होते. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार याचा तपशील देण्यात आला होता. आता परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्रासंदर्भातील तपशील देण्यात आला आहे. 


कधी होणार परीक्षा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दिनांक 2 ते 6 डिसेंबरदरम्यान तसेच दिनांक 11 आणि 12 डिसेंबरला परीक्षा होणार आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 


कुठे मिळेल प्रवेशपत्र?


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावेत आणि वेळापत्रकानुसार  संबंधित केंद्रावर निश्वित वेळेत उपस्थित राहावे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. 


किती पदे भरली जाणार?


‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्टपासून दिनांक 9 सप्टेंबर 2024 दरम्यान तसेच सुधारित जाहिरातीनुसार, दिनांक 21 सप्टेंबर 2024 पासून दिनांक 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. 


रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा


उमेदवारांसाठी दिनांक 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान तसेच दिनांक 11 डिसेंबर आणि दिनांक 12 डिसेंबर २०२४ रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीदरम्यान रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. याठिकाणी उमेदवाराने केलेल्या   अर्ज क्रमांक आणि पासवर्डने लॉगिन करता येईल. लॉगिन केल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध असलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. 


सूचना काळजीपूर्वक वाचा 


प्रवेश पत्रावर उमेदवारांसाठी परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील कार्यवाही करावी. दरम्यान, उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी 9513253233 हा हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आलेला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान (दुपारी 1.30 ते 2.30 वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.