मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
मुंबई महापालिका कर्मचा-यांना १५ हजार रूपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय.
मुंबई : मुंबई महापालिका कर्मचा-यांना १५ हजार रूपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय. १ लाख ५ हजार कर्मचा-यांना हा दिवाळी बोनस मिळणार आहे. मागील वर्षी १४ हजार ५०० रूपये बोनस दिला होता. यामध्ये यंदा ५०० रूपयांची वाढ करण्यात आलीय. मुंबई महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कामगार संघटनांची ४० हजार रूपये बोनसची मागणी होती.