मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईतील अधीश बंगल्याविरोधात मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) दुसरी नोटीस बजावली गेली आहे. मुंबई महापालिकेच्या के वेस्ट विभागाने नारायण राणे यांनी ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे आता १५ दिवसांनी मुंबई महापालिका राणेंच्या बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. (BMC issue second Notice to Narayan Rane)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईतील बंगल्यात काही दिवसांआधी मुंबई महापालिकेचे अधिकारी येऊन तपासणी करुन गेले होते. ज्यामध्ये काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचं पुढे आलं आहे.


नारायण राणेंच्या बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार का? अशी चर्चा ही आता सुरु झाली आहे. महापालिकेच्या के वेस्ट विभागाकडून नारायण राणेंच्या आधिश बंगल्याला दुसरी नोटीस बजावण्यात आली असून १५ दिवसांत स्वत:हून अतिरीक्त अनधिकृत बांधकाम निष्कासीत करा नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल असं पालिकेने म्हटलं आहे.


मात्र, पहिल्या नोटीसीनंतर दुस-या नोटीसीतही १५ दिवसांचेच अल्टीमेटम दिल्यानं पालिकेच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष दौंडकर महापालिका आयुक्तांना राणे बंगला कारवाईप्रकरणी वकिलामार्फत लिगल नोटीस पाठवणार आहेत. नारायण राणेंच्या बंगल्याला वरवरच्या कारवाईची नोटीस काढुन वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्याने केला आहे.