मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई  : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. प्रत्येक घरात मोठ्या उत्साहाने दिवाळीची तयारी केली जातीये. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी करतायेत. त्यात आता सर्व मुंबईकरांसाठी (Mumbaikar) वाईट बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेने (Bmc) कोरोनाचा धोका पाहता (Mumbai Corona Guideline) नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (bmc issued corona guideline due to omicron sub variant before diwali 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पालिकेने मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, असं आवाहन मुंबईकरांना केलं आहे. कोरोनाच्या पहिल्या 2 लाटांमध्ये मुंबईकरांना मोठा धोका होता. मात्र आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीमुळे अखेर कोरोना आटोक्यात आला. मात्र आता पुन्हा ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. त्यामुळे महापालिकेने खबरदारी घेत नवी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  


बीएमसीच्या मार्गदर्शक सूचना (Bmc Corona Guideline)


  • अद्याप लसीकरण केले नसेल, तर ही चांगली वेळ आहे.  तुमची रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात आली असेल किंवा धोका असेल तर, बूस्टर तुमची व्हायरसपासून प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात.

  • घरात हवेशीर वातावरण ठेवा, कारण बंद खोल्यांमध्ये व्हायरस पसरण्यास मदत होते.

  • लक्षणं असलेल्या रुग्णांशी जवळचा संपर्क टाळा

  • वारंवार हात धुवा

  • शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/टिश्यू पेपर वापरा.

  • संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणा. 

  • लक्षणे दिसू लागताच चाचणी करा. परिणामांची वाट पाहत असताना, स्वत: ला इतरांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण संक्रमणाची साखळी तोडू शकता.


ही लक्षण दिसतायेत?  


रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतोय, इम्युनोकॉम्प्रोमाइज केलेले रुग्ण आणि ज्यांनी नुकतेच कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या देशांना भेट दिली आहे, अशा नागरिकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असंही आवाहन पालिकेने केलंय.