मुंबई : मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने आल्यानं जोरदार गोंधळ उडाला. भाजप आमदार अमित साटम यांच्या कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरून हा वाद झाला. आमदार साटम यांना पालिका अधिका-यांना शिवीगाळ करण्याचा काय अधिकार, असा हरकतीचा मुद्दा काँग्रेस नगरसेवकांनी घेतला. त्यावरून भाजपचे नगरसेवक संतप्त झाले आणि गोंधळाला सुरूवात झाली.