मुंबई : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दररोज निष्पाप बळी जात असतात. यामुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना सर्रास समोर येत असतात. पण तेवढ्यापुरते वातावरण तापल्यानंतर परिस्थिती 'जैसे थे' अशीच होऊन जाते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबई महानगर पालिकेला नेहमी धारेवर धरले जाते. पण आता या बदनामीपासून वाचण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नामी क्लृप्ती शोधून काढली आहे. यामुळे खड्डे कितपत कमी होतील हे सांगता येत नसले तरी त्रासलेल्यांचा रोष कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगर पालिकेने खड्डे बुजवणारे नवे तंत्र शोधले आहे. मोबाईलअॅपच्या माध्यमातून पालिका आता खड्डे बुजवू पाहत आहे. हे वाचून थोडेसे अचंबित व्हाल. पण हे खरं आहे. कारण आता खड्ड्याचे प्रश्न आता मोबाईल एपच्या माध्यमातून सुटणार आहेत. 



आजपासून बीएमसीचे mybmc pothole fixit app सुरु करण्यात आले आहे. यावर तुम्ही खड्ड्यांसंदर्भात तक्रार देऊ शकता. यातला महत्वाचा भाग असा आहे की, तक्रार करुनही खड्डे बुजले गेले नाहीत तर तक्रारदाराला 500 रुपये देणार असल्याचं पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. 


खड्डा बुजविण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याच्या खिशातून हे पाचशे रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे आता मुंबईकर किती तक्रारी देतात आणि यातून अधिकारी आता तरी काही धडा घेतील का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.