मुंबई : प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. गाण्यातून बीएमसीच्या कारभाराचे वाभाडे काढणा-या मलिष्काची याप्रकारमुळे मोठी अडचण झाली आहे. बांद्रा पश्चिम, पालीनाका येथील सनराईज बिल्डींगमधील मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेड एफएमची आरजे मलिष्काचे मुंबय तुला बीएमसीवर भरोसा नाय काय हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. हे गाणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं. 


रेड एफएम 93.5 या रेडिओ चॅनेलने मुंबई महानगरपालिकेची बदनामी केल्याबद्दल नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या भेटीत रेडिओ चॅनेलवर कायदेशीर कारवाई करून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली.