मुंबई : महापौर बंगल्याचा आपलाच प्रस्ताव फेटाळण्याची नामुष्की मुंबई महापालिकेवर आली आहे. कागदपत्रांअभावी हा प्रस्ताव पालिकेच्या इमारत विभागाला फेटाळावाच लागला. हेरीटेज कमिटी आणि राज्य कोस्टल झोनकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालं नसल्यानं हा प्रसस्ताव फेटाळावा लागला आहे. शिवाजी पार्क इथं बाळासाहेबर ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ महापौर बंगल्यासाठी प्लॉट देण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाईल असं पालिकेचे आर्किटेक्ट सुरेंद्र बोरले यांनी सांगितलं आहे. जुना महापौर बंगला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर महापौरांसाठी नव्या बंगल्यासाठी मुंबईतील काही ठिकाणांचा विचार करण्यात आला. 


अखेर स्मृतीस्थळाजवळ बंगल्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र कागदपत्रांच्याअभावी हा प्रस्तावही आता फेटाळण्यात आला आहे. यामुळे मुंबईच्या महापौरांसाठी काही नवा बंगला तयार होण्याची चिन्ह दिसत नाहीत.