कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : बातमी मुंबई मनपा घेत असलेल्या बदल्याची... काही वर्षांपूर्वी एका चाळीबाहेर छोटंसं इस्त्रीचं दुकान चालवणाऱ्या रामहरक कनौजिया या धोबीनं आता थेट इथल्या रस्त्यावरच हक्क सांगितलाय. १९६८ मध्ये रेड रोज, मिनी रोज आणि पार्क बे या तीन इमारती बांधल्या गेल्या तेव्हापासून सीएसटी रस्त्याला जोडणारा २२ फुटी रस्ता अस्तित्वात आहे. पण या रस्त्याची ना दुरुस्ती होतंय, ना गटार साफ होतंय... 


हायकोर्टात मागितली दाद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर या सोसायटींनी हायकोर्टात धाव घेतली असता ऑगस्ट २०१७ मध्ये हायकोर्टाने मनपाला अतिक्रमण हटवून रस्ता आणि गटारीचे काम करण्याचे आदेश दिले. यावेळी मनपानं अतिक्रमण करणारा गुंड प्रवृत्तीचा असल्यानं कारवाईस असमर्थता दर्शवली होती. हायकोर्टाने यावर आश्चर्य व्यक्त करत पोलीस संरक्षण घेवून काम करण्यास सांगितले होते. 


आयुक्तांना नोटीस 


तरीही वर्षभर मनपानं काहीच न केल्यानं हायकोर्टाने अखेर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी पालिका आयुक्तांनाच नोटीस पाठवली. यामुळं संतापलेल्या पालिकेच्या एच पूर्व विभागानं रस्ता दुरुस्त करण्याऐवजी तीन सोसायटींना कंपाऊंड वॉल अनधिकृत असल्याचं सांगत त्रास द्यायला सुरूवात केलीय.  


एवढी ताकदवान असलेली मनपा हायकोर्टाच्या आदेशानंतरही कारवाई करण्यासाठी का आणि कुणाला घाबरत आहे? असा प्रश्न निर्माण होतो. जिथे कारवाई करायची तिथे असमर्थ असलेली मुंबई महानगरपालिका नागरिकांना त्रास देण्यात मात्र धन्यता मानतेय.