मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईतील रस्त्यांच्या पुनर्बांधणी आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये १,३४३ रस्त्यांचा जवळपास ५०७ किलोमीटर मार्गाची दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी पालिका लवकरच ६२४ रस्त्यांच्या दुरुस्तीचे कंत्राट काढेल. यासाठी तब्बल १,५०८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापैकी ६२ रस्त्यांच्या दुरुस्तीचे कंत्राट तातडीने काढले जाणार आहे. या रस्त्यांची पुनर्बांधणी झाल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी देखभालीची जबाबदारी कंत्राटदारांकडेच असेल. 


गेल्या काही दिवसांत मुंबई आणि उपनगरांमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक दुर्घटना झाल्या आहेत. यामध्ये अनेक लोकांचे बळी गेल्यामुळे पालिकेच्या कारभारावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने पावसाळा संपल्यानंतर रस्त्यांच्या डागडुजीकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. या संपूर्ण कामावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेकडून १८० अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे.