मुंबई : मुंबईत शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी जाणारी एक स्पीड़बोड दगडावर खरडली गेली, यामुळे बोटीला खालून भगदाड पडलं, असं प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. या बोटीत एकूण २५ जण प्रवास करत होते, यापैकी २४ जण वाचले आहेत, तर सिद्धेश पवार या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या बोटीत पाणी भरण्याआधी शेकाप नेते जयंत पाटील यांना पहिला फोन बोटीतील एका अधिकाऱ्याने केला. यामुळे २५ पैकी २४ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. (काय म्हणाले जयंत पाटील व्हिडीओत खाली पाहा)


२४ जण एका फोनमुळे असे बचावले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेकाप नेते जयंत पाटील यांना साधारण ४ वाजून १० मिनिटांनी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा स्वीय सहाय्यक श्रीनिवास जाधव यांचा फोन आला. 


श्रीनिवास जाधव यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना फोन करून सांगितलं, 'साहेब आमची बोट बुडतेय आम्हाला वाचवा. यावेळी जयंत पाटील यांनी त्यांना लोकेशन विचारलं, आणि क्षणाचाही विलंब न करता, आपल्या २ बोटी घटनास्थळाकडे बचावासाठी रवाना केल्या.'


या दरम्यान श्रीनिवास पाटील यांनी पीएनपी बोट चालकाला सांगितलं, 'बोटीच्या इंजीनचं काहीही खराब झालं, नुकसान झालं तरी चालेल. पण, ५ मिनिटात घटनास्थळी पोहोच'.


या नुसार काही मिनिटात या २ बोटी घटनास्थळी पोहोचल्या. बोटीतील २५ पैकी २४ जणांचा जीव वाचवण्यात यश आलं, पण सिद्धेश पवार सापडला नाही, बोट उलटली तेव्हा खालच्या भागात सिद्धेश असल्याचं सांगण्यात आलं. पण सिद्धेश नंतर सापडला, तोपर्यंत उशीर झाला होता.


बोट बुडत असताना एजाझ चौगुले यांनी १६ लोकांना वाचवलं आहे. एजाझ चौगुले हे पीएनपी बोट चालक आहेत. ते १० मिनिटाच्या आत या ठिकाणी पोहोचले आहेत.