बिष्णोई टोळीच्या हिट लिस्टवर बॉलिवूडच्या या दिग्गजाचे नाव, चौकशीत उघड
मुसावाला हत्या प्रकरणाचं कनेक्शन पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहे.
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या अटकेत असलेल्या सौरभ महाकाल याने तपासादरम्यान पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली आहे. बिष्णोई टोळीने यापूर्वी अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण सलमान खानसह बॉलिवूडच्या एका बड्य़ा डायरेक्टरचं नाव देखील हिट लिस्ट वर असल्याचं पुढे आलं आहे.
बिष्णोई टोळीच्या हिट लिस्ट मध्ये करण जोहरचे नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी मुबंईतील बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. करण जोहर कडून पाच कोटी रुपयांची खडणी वसूल करण्याचा त्यांचा प्लान होता. मुबंई पोलिसांनीही पुण्यात येऊन महाकालची चौकशी केली होती.
सौरव महाकाल याने संतोष जाधव आणि नवनाथ सूर्यवंशी यांची लॉरेन्स बिश्नोई टोळीशी ओळख करून दिली होती. अशी माहिती आहे. या दोघांनी मूसावाला याच्यावर गोळीबार केला होता.
पंजाबमधील गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पंजाब पोलिसांनी या प्रकरणात अनेक गुन्हेगारांना अटक केली. ज्याचं कनेक्शन आता पुण्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे.