मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक प्रथमच 35 हजार अंशांच्या वर बंद झालाय. सकाळच्या वेळात काही प्रमाणात चढउतार बघायला मिळाली असली, तरी त्यानंतर सेन्सेक्समध्ये सातत्यानं वाढ होत राहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारनं अतिरिक्त कर्जाचा अंदाज 50 हजार कोटींवरून 20 हजार कोटींवर खाली आणलाय. त्यामुळे वित्तीय तूट अपेक्षित टप्प्यात राहण्याची शक्यता बळावलीये. याचा चांगली परिणाम गुंतवणूकदारांवर झाला. त्यामुळे आशियाई बाजारांमध्ये काहीशी नाजूक स्थिती असतानाही मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारांचे बैल उधळल्याचं बघायला मिळालं.


परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स 311 अंशांच्या वाढीसह 35 हजार 81 अंशांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 88 अंशांच्या वाढीसह 10 हजार 778 अंशांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला.