गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मेहनत करुन पैसे कमावण्यावर अनेकांचा विश्वास नाही. काही लोकांना पैसा कमावण्याचा शॉर्टकट हवा असतो. मुंबईतल्या एका तरुणाला पैसे कमावण्यासाठी चक्क जिगोला म्हणजेच पुरुष वेश्या व्हायचं होतं. इंटरनेटवर सर्च करत असताना त्याला एका वेबसाईटचा पॉप अप दिसला. त्या पॉपअपवर क्लिक केल्यानंतर त्याच्याकडून काही कागदपत्रं मागितली गेली. जिगेलो झाल्यावर बक्कळ पैसा मिळेल अशी त्याला थाप मारली गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवेगळी कारणं सांगून तरुणाजवळून पैशांची मागणी केली जाऊ लागली. तरुणानं तब्बल ३ लाख ८० हजार रुपये भरले. पण तरीही त्याला काम मिळालं नाही. तेव्हा फसवणूक झाल्याचं तरुणाच्या लक्षात आलं.


या प्रकरणी दहीसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पण पैसे आणि मौजमजा करण्यासाठी तरुणाई किती टोकाला जाऊ शकते हे या निमित्तानं अधोरेखित झालं आहे. याआधी देखील या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहण्याची गरज आहे.