मुंबई : सणांना सुरूवात होण्याअगोदरच लोकप्रिय ज्वेलरी ब्रांड तनिष्कने आपली जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली. मात्र ही जाहिरात शेअर होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली. ट्विटरवर ही जाहिरात ट्रोल होत आहे. या जाहिरातीमध्ये हिंदू - मुस्लिम नातेसंबंधाबद्दल दाखवण्यात आलं आहे. हिंदू तरूणीचा विवाह मुस्लिम समाजातील तरुणाशी होतो. या जाहिरातीवर युझर्सने इतका राग व्यक्त केला की,#BoycottTanishq असा ट्रेंड देखील सुरू झाला. तनिष्कने ती जाहिरात काढून टाकली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे तनिष्कची जाहिरात? तनिष्कच्या जाहिरातीमध्ये एक हिंदू महिला दाखवण्यात आली आहे. जिने मुस्लिम कुटुंबातील मुलाशी लग्न केलं आहे. व्हिडिओत ही महिला गरोदर असून तिचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दिसत आहे. मुस्लिम कुटुंबात ही पद्धत नाही. त्यामुळे ती आपल्या सासूला हा प्रश्न विचारते. 'आई आपल्या घरात ही पद्धत नाही तरी आपण?' त्यावर सासू उत्तर देते की, ही पद्धत आपल्यात नाही पण मुलगी खूष राहणं जास्त महत्वाचं आहे. हिंदू-मुस्लिम कुटुंबात एकजूट दाखवण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न केला गेला आहे.



या व्हिडिओला सोशल मीडियावर पसंत करण्यात आलं नाही. या व्हिडिओवरून लव-जिहाद मुद्दा देखील समोर आला. जाहिरात वेगळी आणि रिऍलिटी वेगळी आहे. त्यामुळे तनिष्कने देखील ही जाहिरात सोशल मीडियावरून काढली टाकली आहे.