मुंबई : मुंबईतील कुर्ल्याच्या नाईक नगर परिसरात सोमवारी रात्री उशिरा चार मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली


ढिगाऱ्यातून 14 जणांना बाहेर काढण्यात यश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखालून 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. मात्र अजूनही काही लोक खाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे मदतकार्यात मदतीसाठी एनडीआरएफलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय.


अपघातानंतर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांन घटनास्थळी भेट दिलीये. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मजली इमारत जीर्ण झाली होली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. असं असतानाही ते या ठिकाणी राहत होते. 


भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून आता मंगळवारी म्हणजेच आज या चार इमारती रिकाम्या करून पाडण्यात येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.