दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लांबलेल्या पावसामुळे जुलैच्या मध्यापर्यंत राज्यात केवळ २४ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात भाताची पेरणी सर्वात कमी म्हणजे ७ टक्के क्षेत्रावरच झाली आहे. तर कापसाची पेरणी सर्वाधिक असून ती ४६ टक्के क्षेत्रावर झाली आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील १ कोटी ४९ लाख ७३ हजार ७२० हेक्टर क्षेत्रापैकी ३५ लाख ६७ हाजर ९३६ हेक्टर क्षेत्रावरच म्हणजे २४ टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरीप तृणधान्यची १२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून यात भाताची पेरणी ७ टक्के आणि ज्वारीची पेरणी १० टक्के क्षेत्रावर झाली आहे. कडधान्याची पेरणी १९ टक्के क्षेत्रावर झाली असून यात तूरीची पेरणी २१ टक्के आणि मूगाची पेरणी १६ टक्के क्षेत्रावर झाली.


तेलबियांची पेरणी २१ टक्के क्षेत्रावर झाली असून भुईमुगाची पेरणी २३ टक्के आणि सोयाबीनची पेरणी २१ टक्के क्षेत्रावर झाली आहे.


राज्यात कापसाची पेरणी सर्वाधित झाली असून ४६ टक्के क्षेत्रावर ही पेरणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.