बैलगाडा शर्यत आयोजकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
बैलगाडा शर्यत आयोजन करण्याऱ्यांवर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय
मुंबई : बैलगाडा शर्यत आयोजन करण्याऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी ही माहिती दिली आहे. . (Government withdrawal of offenses on bullock cart race)
बैलगाडा शर्यतीसंबंधी आयोजकांवर दाखल करण्यात आलेले विविध गुन्हे मागे घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. मंत्रिमंडळाने आज बेलगाडाप्रेमींना याबाबत दिलासा दिला आहे. बैलगाडी शर्यत आयोजन केल्य़ामुळे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
महाविकासआघाडी सरकार याबाबत सकारात्मक होती. पण आता बैलगाडा शर्यतीशी संबंधित गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदीच्या उठावी म्हणून विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती. अनेकांनी बंदीला झुगारुन बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं होतं. ज्यामुळे कायद्याच्या उल्लंघनामुळे अनेक लोकांवर गुन्हे दाखल आले होते. सुप्रीम कोर्टाने देखील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे आता बैलगाडा शर्यती सुरु झाल्या आहेत.