मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐनवेळी प्रस्ताव आल्यामुळं चर्चा करायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यात काही त्रुटीदेखील राहून जातात, असं मुख्यमंत्र्यांचं मत आहे. किमान ७ दिवस अगोदर, असे प्रस्ताव मुख्यमंत्री सचिव कार्यालयाकडे देण्यात यावेत, अशी ताकीद वजा सूचना मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांनी सर्व विभाग सचिवांना केलीय.


या प्रस्तावांबाबत संबंधित मंत्र्यांची परवानगी आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता करणं गरजेचं असणार आहे. याचं उल्लंघन झाल्यास गंभीर नोंद घेणार असल्याचा इशाराही सचिवांनी दिला आहे.