दीपक भातुसे / मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. तर सिडकोबाबत कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. दरम्यान,  सिडकोच्या गैरव्यवहार कॅगचा ताशेरे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहवालात सिडकोतील मोठा गैरव्यवहार समोर येणार अशी चर्चा आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई विमानतळाच्या कामातील सिडकोच्या गैरव्यवहार कॅगचा ताशेरे असल्याची चर्चा आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर १२ वाजता कॅगचा अहवाल मांडला जाणार आहे. मागील आठवड्यात या अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानंतर अहवाल राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, राज्यपालांनी यावर सही केली नव्हती. त्यामुळे उटलसुटल चर्चा होती. दरम्यान, राज्यपालांची स्वाक्षरी होऊन अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाल्यानंतर आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला जाणार आहे.


 कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडला गेल्यास यावरुन जोरदार राजकारण होण्याची शक्यता आहे. तसेच या अहवालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अहवालात सिडकोतील मोठा गैरव्यवहार समोर येणार अशी चर्चा आहे. भाजपच्या काळातील सिडकोतील गैरव्यवहार पुढे आला तर भाजपसाठी ही मोठे डोकेदुखी ठरणार आहे. पारदर्शक कारभार असे भाजपने धोरण होते. याला तडा जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.