भास्कर जाधव यांच्यासह अंबादास दानवे आणि अरविंद सावंत याच्यावर गुन्हे दाखल
नवी मुंबईत ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलीस यंत्रणा आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्य व्यक्तव्य केल्या प्रकरणी आंबादास दानवे , खासदार अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विना परवाना मोर्चा काढल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या 20 पदाधिकारी आणि 700 कार्यकर्त्यां विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाजपचे सदस्य आणि राणे समर्थक सोहम काटे यांनी पोलिसांत या विरोधात तक्रार दाखल केली होती. आज शिवसेना ठाकरे गटाच्या मोर्च्यानंतर मीडिया सोबत संवाद साधताना राणेंवर टीका केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्रूनुकसान, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान, चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांवर दडपशाहीचा आरोप करत ठाकर गटाकडून हा मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून भाजप आणि शिंदे गटावर देखील जोरदार टीका करण्यात आली.