कृष्णात पाटील, मुंबई : वरळीतील युनियन पबवर जी दक्षिण विभागाकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कोविड नियमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पबला कारणे दाखवा नोटीस बजावली अूसन परवाना तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आला आहे. मुंबई पोलीस, मार्शलसह मुंबईतील पब, नाईट क्लबविरोधात कारवाई आणखी कडक करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेच्या संतोष धुरींनी आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वळीतील पब चालु कसे, वरळी महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? असा सवाल केला होता. 


मुंबईतील वरळीतल्या एका पबमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यानं वाद निर्माण झाला आहे. सोशल डिस्टन्सिंग केवळ शिवजयंतीला असतं. मात्र नाईट लाईफला नसतं असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. तर वरळीत रात्री चालणा-या पब आणि बारवर कारवाई होणार असल्याचं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं. यासंदर्भात वरळीतील काही पबची माहिती मिळाली असून त्यांच्यावर नक्की कारवाई करू आणि वेळ पडली तर त्यांचं लायसन्सही रद्द केलं जाईल अशी प्रतिक्रिया मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली होती.