सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी पूर्ण, जाणून घ्या काय झालंय
सीबीआय कोर्टात यासंदर्भातील अहवाल सादर करणार
मुंबई : अभिनेता सुशांतसिह राजपूत मृत्यूप्रकरणाची सीबीआय करत असलेली चौकशी पूर्ण झालीय. सीबीआयला याप्रकरणात कोणतेही कट कारस्थान आढळले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने आपली चौकशी पूर्ण केली असून पटणाच्या सीबीआय कोर्टात यासंदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ही आत्महत्या नसून हत्या होती असा ठपका ठेवण्यात आला होता. राज्य सरकारच्या मोठ्या नेत्यांच्या दबावामुळे हे प्रकरण पुढे येत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.
त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण बरेच दिवस चर्चेत राहीले. पण प्रत्यक्ष सुशांत मृत्यू प्रकणात काही महत्वाची माहीती समोर येत नव्हती. त्यानंतर आता सीबीआयने हा तपास पूर्ण केल्याचे सांगण्यात येतंय.